उचगाव :
उचगाव येथे तीन पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यामुळे बुधवार दि. 3 जूनपासून पाच दिवस संपूर्ण गाव लॉक करण्यात आलेले आहे. गावातील सर्व व्यवहार दुकाने पाच दिवस बंद ठेवण्याचा आदेश, त्याचप्रमाणे गावातील कोणीही नागरिक बाहेर जाऊ नये व बाहेरील नागरिक कोणीही गावात येऊ नये. तरी सर्वांनी याची नोंद घेऊन उद्यापासून पाच दिवस कोणी घरातून बाहेर पडू नये. बाहेर पडल्यास त्याच्यावर कायदेशीर इलाज केला जाईल, असे पोलीस खात्याच्यावतीने कळविण्यात आले आहे.