उत्कटासन करणे म्हणजे काल्पनिकरित्या खुर्चीत बसणे. थोडक्यात, खुर्चीवर बसल्याची पोझ घेणे. अर्थात ही पोझ घेऊन स्थिर राहणे.
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पायात थोडे अंतर घेऊन ताठ उभे राहा.
- तळहात जमिनीकडे असतील अश्या रीतीने हात खांद्याच्या रेषेत वर उचला. हात कोपरात वाकवू नका.
- आता गुडघे वाकऊन आपले ओटीपोट असे खाली आणा जसे तुम्ही खुर्चीवर बसत आहात. अशा स्थितीत स्थिर रहा.
- हात जामिनाला समांतर आहेत नां, याची खात्री करा.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाठ ताठ ठेवा आणि श्वसन सुरु ठेवा.
- सरावानंतर हळुवार खाली सरकून आणखी खोल बसा. पण आपले गुडघे आपल्या पावलांच्या पुढे नाहीत ना याकडे लक्ष द्या.
फायदे काय?
- या आसनाने पाठीचा कणा, कंबर आणि छातीच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.
- पाठीचा खालील भाग आणि धड मजबूत बनण्यास मदत होते.
- मांड्या , घोटे आणि गुडघ्याचे स्नायू मजबूत बनतात.
- जर पायाचे कोणतेही दुखणे असेल किंवा कंबरेचे दुखणे असल्यास हे आसन करु नये.