लखनौ
उत्तरप्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात भरवारी रेल्वेस्थानकानजीक मंगळवारी दुपारी सियालदह-अजमेर एक्स्प्रेसला आग लागली. ही दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचे सांगण्यात येते. आग लागल्याची माहिती कळताच चेन पुलिंग करून रेल्वे रोखण्यात आली होती. रेल्वेच्या डब्यात आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. लोकांनी त्वरित रेल्वेच्या डब्यांमधून बाहेर पडत स्वत:चा जीव वाचविला आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलत या आगीवर नियंत्रण मिळविले आहे.