ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढणार आहे. बसपा प्रमुख सुप्रीमो मायावती यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
मायावतींनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवणूक बसपा ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम सोबत एकत्र लढेल, अशी बातमी एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. त्यामध्ये तथ्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडन करते.
तसेच बसपा पुन्हा स्पष्ट करते की, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढणार आहे.