- योगी सरकारकडून नियमावली जाहीर
ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात 23 नोव्हेंबरपासून सर्व सरकारी आणि खाजगी कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत अप्पर मुख्य सचिवांनी प्रदेशातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, उच्च शिक्षण निर्देशक, प्रयागराजमधील सर्व सरकारी व खाजगी कॉलेजच्या कुलसचिवांना पत्र लिहून आदेश दिले आहेत.
जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, वर्गात जास्तीत जास्त 50% विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. तसेच कॉलेज स्टाफला कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- या आदेशात विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्व विद्यार्थ्यांनी फेस कव्हर किंवा मास्क वापरणे अनिवार्य आहे.
- यासोबतच सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
- मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्यात यावे.
विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे. यासोबतच आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यावर जोर दला पाहिजे.