उत्तरकाशी
उत्तराखंडमध्ये शनिवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पूर्व उत्तरकाशी येथे पहाटे 5.03 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. या धक्क्यामुळे कोणत्याही मोठय़ा नुकसानीचे वृत्त नाही. उत्तरकाशी जिह्याच्या पूर्वेकडील भागात भूकंपाचे धक्के तीव्र स्वरुपात जाणवले. मागील तीन दिवसांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. हिमालय पर्वत आणि त्याच्या जवळ असलेली राज्ये ही भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. उत्तराखंड हे राज्य भूकंपासाठी अतिशय संवेदनशील आहे. उत्तराखंडमध्ये अनेकदा सौम्य स्वरुपाचे भूकंप होतात. या भूकंपांचे धक्के जाणवत नाही. पण उत्तरकाशी जिह्यात शनिवारी झालेल्या भूकंपाचे धक्के जाणवले.