ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये मागील चोवीस तासात कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1819 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या 34 रुग्णांमध्ये देहरादून मध्ये 14, उत्तर काशिमध्ये 3, टिहरीमध्ये 9, हरिद्वार मधील 5 तर उधम सिंह नगर, चमोली आणि नैनितालमधील प्रत्येकी एक जणांचा सहभाग आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण 1819 रुग्णांपैकी 1000 पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 705 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे ही पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.