ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उत्तराखंडात कोरोना बाधितांचा आकडा दोन हजार पार झाला आहे. बुधवारी कोरोनाचे 81 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2023 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या रुग्णांमध्ये हरिद्वारमध्ये 3, अल्मोडामध्ये 14, देहरादूनमध्ये 35, नैनिताल 8, टिहरीमध्ये 9, रुद्र प्रयाग 2, पौडी आणि उत्तर काशिमध्ये प्रत्येकी एक, बागेश्र्वर 5 आणि ऊधमसिंह नगरमधील 3 जणांचा सहभाग आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण रुग्णांपैकी 1254 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 717 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.