- प्रदेशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडातून दिलासादायक बाब समोर आली आहे. प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मागील 24 तासात पाच जिल्ह्यात मिळून 54 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 02 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 96,590 इतकी आहे. सद्य स्थितीत 790 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 7167 नमुने निगेटिव्ह आले. देहरादूनमध्ये 18 नवे रुग्ण आढळून आले. चमोली 7 हरिद्वार 3, नैनिताल 17, उधमसिंह नगर 9 तर अन्य आठही जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1673 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 67 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 96, 590 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.