ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात 15 दिवसानंतर पहिल्यादांच एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. तर मागील 24 तासात 54 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर केवळ एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 96,820 इतकी झाली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 7,052 नमुने निगेटिव्ह आले. तर 15 दिवसानंतर पहिल्यांदाच एकही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. यापूर्वी 29 जानेवारीला देखील एकाही रुग्णाने कोरोनामुळे आपला जीव गमावला नव्हता.
प्रदेशात काल 54 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये देहरादून मध्ये 26 नवे रुग्ण आढळून आले. हरिद्वार 9, उधमसिंह नगर 6, नैनिताल 12 आणि चंपावतमध्ये एक रुग्ण आढळून आला. तर अन्य 8 जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 93,061 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.12 % इतके आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असून सद्य स्थितीत 687 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.