ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंड प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. डोंगराळ भागात कोरोना संसर्ग सर्वाधिक आहे. यामध्ये विशेषतः टिहरी, नैनीताल आणि बागेश्र्वर हे जिल्हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तर उधमसिंह नगर, देहरादून आणि हरिद्वारमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या रिपोर्ट नुसार, 15 मार्च ते 15 जून दरम्यान, प्रदेशात 40 हजार पेक्षा अधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार प्रदेशात संसर्गाचे प्रमाण 4.54 टक्के आहे. तर टिहरी जिल्ह्यात हे प्रमाण सर्वात जास्त आहे.
टिहरीमध्ये आतापर्यंत 2614 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 294 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर संसर्गाचे प्रमाण 11.25 टक्के आहे. दुसऱ्या स्थानावर नैनीताल असून संसर्गाचे प्रमाण 8.19 तर बागेश्वर जिल्ह्यात हेच प्रमाण 7.30 टक्के इतके आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाचे प्रमाण उधमसिंह नगरमध्ये 2.21 टक्के, हरिद्वारमध्ये 3.26 आणि देहरादून मध्ये 3.35 टक्के आहे.
कोरोना आकड्यांचा अभ्यास करणाऱ्या सोशल डेवलपमेंट फॉर कम्युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष अनुप नौटियाल यांच्या मते, शहरी भागातूनच डोंगरी भागात कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. तरी देखील डोंगरी भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे डोंगराळ भागात टेस्टचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे.