- खात्यात जमा होणार एक हजार रुपये
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडातील जवळपास 50 हजार अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांना राखी पौर्णिमेनिमित्त एक एक हजार रुपयांचा सन्मान निधीची भेट मिळणार आहे. रविवारी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी रक्षाबंधन सणानिमित्त या सन्मान निधीची घोषणा केली. याआधी देखील त्यांच्या आदेशावरून अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांना एक एक हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांनी सांगितले की, कोरोना संकटामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही एकत्र येऊ शकत नाही. सामूहिकरित्या सण साजरा करू शकत नाही. अशा स्थितीतही आमच्या हजारो अंगणवाडी आणि आशा भगिनी पुढाकार घेऊन काम करत आहेत. त्या कोरोना पासून स्वतःबरोबर इतरांनाही वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकार किशोरवयीन मुलींसाठी सेनेटरी नॅपकिन योजना घेऊन येत आहे. तसेच रक्षाबंधन सणानिमित्त महिलांना रोडवरील बसमधून निःशुल्क प्रवास करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.