ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात प्रदेशात 213 नवे रुग्ण आढळून आले. तर 740 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना अपर मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, प्रदेशात सद्य स्थितीत 4 हजार 163 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणत घट
पुढे ते म्हणाले की, मागील दोन महिन्यात सक्रिय रुग्ण संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यामूळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून सध्या हे प्रमाण 98 % पेक्षा अधिक आहे. पुढे ते म्हणाले मागील 24 तासात 2,81,000 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
- लसीकरणाचा डाटा
मागील 24 तासात प्रदेशात 4 पेक्षा अधिक जणांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत 2,56,00,000 पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या प्रदेशात लसीकरण केंद्राची संख्या 7 हजार इतकी आहे. तर जुलै महिन्यापासून दररोज 10 लाख लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.