आमदार सोपटे यांचे प्रतिपादन : मधलावाडा-पालये येथे 67 वा शारदोत्सव
वार्ताहर /पालये
गावातील प्रमुख सण, उत्सवांबरोबरच वाडय़ावर होणाऱया कार्यक्रमांनाही फार महत्त्व आहे. यातून वाडय़ावरील एकजुटीचे दर्शन घडते, असे प्रतिपादन मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी केले.
मधलावाडा-पालये येथील 67 व्या शारदोत्सवात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मांद्रे मतदारसंघ भाजप मंडळाध्यक्ष तथा पंचसदस्य मधु परब, उपाध्यक्ष गोविंद आसगावकर, आयडियल इंग्लिश हायस्कूलचे चेअरमन जितेंद्र तिळवे, ‘तरुण भारत’चे उपसंपादक राजेश परब, ज्येष्ठ नागरिक रमेश परब, ज्ञानेश्वर परब, उद्योजक महेश परब, आयोजन समितीचे अध्यक्ष अनिल परब, उपाध्यक्ष अभिजित परब, खजिनदार स्वप्नेश परब, उपखजिनदार शिवा परब, सचिव उल्हास परब, उपसचिव वासुदेव परब, मुखत्यार भगवान परब, उपमुखत्यार नारायण परब यांची उपस्थिती होती.
शारदेचा उत्सव म्हणजे विद्येचा गौरव आहे. या शारदोत्सवानिमित्त चांगले ज्ञान संपादन करून यश संपादन करण्याचे ध्येय बाळगावे. आपण खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले आहे. मांद्रे मतदारसंघातील नऊ पंचायतीमधून कोणीही विद्यार्थी आर्थिक कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहू नये, ही आपली धारणा असून कोणालाही सहकार्य हवे असल्यास ते द्यायला आपण तयार असेन. पालये गावाबद्दल आपल्याला आत्मियता आहे. येथील विकासकामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असेही आमदार सोपटे म्हणाले.
पंचायत सदस्य मधु परब आपल्या भाषणात म्हणाले की, या प्रभागातूनच आपली राजकीय सुरुवात झाली आहे. या वॉर्डात आमदार सोपटे यांच्या सहकार्यातून 35 लाख रुपये रकमेचा ट्रान्सफॉर्मर तसेच स्मशानभूमी रस्ता करण्यात आला आहे. मांगरासभोवतालच्या सुशोभिकरणाचे कामही हाती घेण्यात येईल, यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. तसेच आगामी निवडणुकीत आमदार सोपटे यांच्या यापुढेही पाठीशी राहावे, असे आवाहनही मधु परब यांनी केले.
राजेश परब यांनी आपल्या भाषणात आयोजकांच्या कौतुक केले. हा उत्सव अव्याहतपणे सुरू राहावा. तसेच शंभरावा उत्सव भरगच्च व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन प्रकाश विश्वनाथ परब यांनी केले व त्यांनीच आभार मानले. व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांनीच परिचय करून दिला. व्यासपीठावरील मान्यवरांचे श्रीधर परब, कमलाकांत परब, संदेश सद्गुरु परब, परशुराम परब, ज्ञानेश्वर परब, काशिनाथ परब, सहदेव परब, गजानन परब, भरत परब, रुद्रेश परब, दिलीप परब, महेंद्र परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार सोपटे यांनी आयोजकांतर्फे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमानंतर आमदार सोपटे यांच्या सौजन्याने वेदांत एंटरटेनमेंट वाळपईतर्फे दशरथ मांद्रेकर निर्मित ‘बुटकुल्याचो फार’ हे विनोदी नाटक झाले.