उदगाव / वार्ताहर
उदगांव ता.शिरोळ येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री महादेवी मंदिरातून देवीचे सोन्याचे चार मंगळसूत्र लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यात आठ सोन्याच्या वाट्या व 22 मनी असलेले मंगळसूत्र असे एकुण 7 ग्रॅमचा मुद्देमाल चोरट्यांनी कुलूप तोडून लंपास केला आहे. याबाबतची फिर्याद अमोल कदम यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील गावाच्या मध्यवस्तीत श्री महादेवी देवीचे मंदिर आहे. सोमवारी मध्यरात्री मंदिराच्या दरवाजातून चोरट्यांनी मुख्य गाभार्यात प्रवेश केला व श्री महादेवी देवीच्या अंगावर असलेले 4 मंगळसुत्र चोरट्यांनी लंपास केला. हा ऐवज सुमारे 30 हजार रूपयेचा आहे. अधिक तपास जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्री कोरवी करीत आहेत. या महिन्यात गावामध्ये तीन वेळा चोरीचे प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावामध्ये पोलीस गस्ती चे प्रमाण रात्री वाढविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.