राज ठाकरेंनी केले शाही पद्धतीने स्वागत,मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता
प्रतिनिधी / सातारा
खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी राज्याच्या प्रमुख मंडळींची भेट घेतलेली आहेच परंतु केंद्रातल्या मंत्र्यांचीही भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतल्याबरोबर शरद पवारांची दोन वेळा तब्बल भेट घेतली आहे. आता त्यांनी तर चक्क मनसेच प्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर जावून भेट घेतली. भेटीत मराठा आरक्षणाबाबतच चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज ठाकरे यांची ही तशी पहिलीच भेट असून दोघेही सडेतोड बाण्याचे म्हणून ओळखले जातात. खासदार उदयनराजे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य यांची भेट घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणासाठी सर्व नेत्यांची एकत्रीत बैठक घेण्याचेही त्यांनी जाहीर केले होते. खासदार उदयनराजेंनी घेतलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ते तडीस नेईपर्यंत गप्प बसणार नाहीत. त्यांनी शनिवारी मुंबईत मनसेचे प्रमुख राजे ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर हजेरी लावली. राजे कृष्णकुंजवर आल्याचे पाहून राज ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. परंतु मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विषय झाल्याची चर्चा सुरु होती.