प्रतिनिधी/ सातारा
6 ऑक्टोबर 2017मध्ये आनेवाडी टोलनाक्यापासून सुरुची बंगल्यापर्यत झालेला राडा, तसेच त्यांच्या दुस्रया वर्षी जुन्या मोटर स्टँड येथील दारूच्या दुकानावरून खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटात झालेला वाद या दोन्ही प्रकरणी न्यायालयात कागदपत्रे पूर्तता करण्याकामी खासदार उदयनराजे हे कार्यकर्त्यांसह हजर झाले होते. लवकरच सूनवणी सुरू होईल अशी माहिती ऍड.संदेश कुंजे यांनी मीडियाला दिली.
आनेवाडी टोलनाका हस्तांतरण प्रक्रिया सुरू सुरू असताना दिनांक 6 ऑक्टोबर 2017 रोजी राडा झाला होता. खासदार उदयनराजे यांचे समर्थक व आमदार शिवेंद्रराजे यांचे समर्थक एकमेकांना भिडले होते. तेथून सुरुची बंगल्यापर्यंत राडा सुरू होता. त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता तसेच त्याच्या दुस्रया वर्षी जुना मोटर स्टँड येथील दारूच्या दुकानाच्या जागेवरून दोन्ही गट आमने-सामने आले होते. त्यावरूनही गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही गुह्याकामी न्यायालयात कागदपत्रे सादर करण्यासाठी खासदार उदयनराजे हे स्वतः कार्यकर्त्यांसमवेत हजर झाले होते. कागदपत्रांची पूर्तता करून ते कार्यकर्त्यांसमवेत बाहेर पडले.
ऍड.संदेश कुंजे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की खासदार उदयनराजे हे त्यांच्या अशिलांसमवेत कोर्टात हजर होते. कायदेशीर बाबींची पुर्तता करण्याकरीता उदयनराजे यांना कोर्टासमोर हजर रहावे लागले होते. या दोन्ही फिर्यादी अंतर्गत पोलिसांनी खासदार व आमदार समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशासन आणि वैयक्तीक अशा दोन्ही फिर्यादी दाखल करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणात जवळपास 100 ते 150 संशयित आरोपी आहेत. त्यासाठीची लवकर सुनावनी सुरू होईल,असे त्यांनी सांगितले.