उद्यानाचे काम अर्धवट, जाधव नगर परिसरातील प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
जाधवनगर परिसरात शंभर कोटी अुनदानामधून उद्यानाचे काम करण्यात आले. याठिकाणी समुदाय भवनच्या उभारणीचे काम पुर्ण झाले आहे. मात्र उद्यानाच्या विकासाचे काम अर्धवट असताना केवळ समुदाय भवनचे उद्घाटन करण्यासाठी महापालिकेची घिसाडघाई सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. प्रशासनाच्या घिसाडघाईबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जाधव नगर परिसरात महापालिका प्रशासनाने दाने उभानांचा विकास करण्याचे काम हाती घेतले होते. पण एका उद्यानाचे काम पुर्ण झाले आहे. हनुमान मंदिर परिसरातील उद्यानाचे काम अद्याप अपुर्ण आहे. याठिकाणी लॉन व फुलाची झाडे लावण्याचे काम करण्यात आले नाही. तसेच लहान मुलांच्या खेळाचे साहित्य मोकडळीस आले आहे. केवळ ग्लास हाऊसचे काम पुर्ण झाले आहे. पण ग्लास हाऊसच्या मागील बाजूच्या सरंक्षक भिंतीचे काम अपुर्ण आहे. अशी विविध विकासकामे अर्धवट असताना ग्लास हाऊसचे उद्घाटन करण्याची घिसाडघाई चालविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी अर्धवट असलेली विकासकामे पुर्ण झाल्यानंतरच उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी होत आहे. उद्घाटन करण्यापुर्वीच महापालिका प्रशासनाने अर्धवट कामे पुर्ण करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. उद्घाटन उरकल्यास मनपाचे अधिकारी ढुंकूनही पाहणार नसल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. यामुळे उद्घाटन करण्यासाठी घिसाडघाई करण्यापुर्वी विकासकामे पुर्ण करण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.