बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटक राज्यत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राजधानीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ब्रुह बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) राज्य कोविड टास्क फोर्सप्रमाणेच कोविड टास्क फोर्सची स्थापना केली आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजधानीत लॉक डाऊन आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उद्यापासून बेंगळुरुमध्ये कोणत्याही प्रकारची टाळेबंदी होणार नसल्याचे म्हंटले आहे. तसेच त्यांनी राज्यातल्या जनतेला हात जोडून मास्क घालण्याची आणि सामाजिक अंतराची राखण्याची विनम्र विनंती केलीये आहे. तसेच लस होईपर्यंत किमान कोविड १९ चा सामना करण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात राज्याला यश आले आहे, परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. कोरोना रुग्णात आता वाढत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असल्यास सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे म्हंटले आहे.
साथीच्या रोगासंदर्भात व्हेंटिलेटर व इतर उपकरणे खरेदी करताना सरकारने भ्रष्टाचार केल्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना येडियुरप्पा यांनी आम्ही कोरोना उपकरणे खरेदीसंदर्भात कोणतीही माहिती २४ तासांत देण्यास तयार आहोत, असेही मुख्यमंत्रांनी म्हंटले आहे.