मार्च महिना म्हणजे कडक उन्हाळय़ाची चाहूल. अशा कडक गर्मीमध्ये नक्की काय घालावं हा प्रश्न नेहमीच पडतो. आणि निव्वळ उन्हाळा आहे म्हणून फॅशन करायचीच नाही असं कसं होणार? रोज रोज कॉटनचे डेस घालणंही शक्मय नसतं. तेवढे कॉटनचे कपडेही कपाटात नसतात. आणि ऐन गर्मीत फॅशनच्या नावाखाली अन्य काही कपडे घालून घामाच्या धारांमध्ये चिंब भिजणंही परवडणारं नाही. यातला मध्यममार्ग तर हवा आणि तसे अनेक पर्याय आज बाजारात उपलब्ध आहेत. किंबहुना गेली काही वर्ष सातत्याने फॅशन डिझायनर्स आरामदायी, सहज वापरता येतील आणि उठून दिसतील अशी कम्फर्टेबल फॅशन डोळय़ांसमोर ठेवून काम करतायेत. त्यामुळे दरवषी उन्हाळय़ात काही एक नवा टेण्ड या फॅशनेबल कपडय़ांमध्ये नक्कीच अनुभवायला मिळतो. यावर्षी असा नवीन टेण्ड कोणता आहे इथपासून ते उन्हाळय़ात तुमची फॅशन आणि तुम्ही कूल कसे राहाल, यासाठी सध्या उपलब्ध असलेले टेण्ड्स फायदेशीर ठरतील.
काय करावे-काय टाळावे
उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. या दिवसांत सूर्याची तीव्र उष्णता शरीरातील स्निग्धता कमी करते. त्यामुळे कडक उन्हाचा त्वचेशी थेट येणारा संपर्क टाळायला हवा. या दिवसात खूप घाम येत असल्याने कमी कपडे घालण्याकडे अधिक कल असतो. पण विशेषतः बाहेर पडताना त्वचा कपडय़ांनी झाकणे गरजेचे असते. पण अंगभर कपडे घातले तरी त्वचेतील उष्णता बाहेर टाकण्याच्या कार्यात अडथळा येता कामा नये अशा प्रकारचे कपडे असावेत. सिंथेटिक कापडाचे कपडे टाळावेत. ते उष्णता कोंडून ठेवतात. त्याऐवजी सुती, खादीचे किंवा कोणतेही नैसर्गिक कापडाचे कपडे वापरावेत.
तापमान दिवसेंदिवस आपली उंची गाठत आहे. अशात कायम प्रश्न पडतो की, कोणते कपडे घालावेत. नेमकं काय टाळावे आणि काय घालावे हेच कळत नाही. कपडे निवडताना काही गोष्टींचा विचार अगदी सावधपणे करायला हवा जेणेकरून उन्हाच्या झळा लागणार नाहीत. आणि हे सगळं करताना आपण स्टायलिश कसे राहू हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. गडद किंवा डार्क रंग टाळावेत. उदा. लाल, काळा हे रंग सूर्यकिरणांना शोषून घेतात व शरीरात उष्णता निर्माण करतात. हलके रंग डोळय़ांना शांतता देतात म्हणून गुलाबी, आकाशी, पांढरा, पिवळा आणि पेस्टल शेड्स या रंगांचे कपडे वापरावेत. या दिवसात फिटिंगच्या कपडय़ांचा वापर शक्मयतो टाळावा. अन्यथा उष्णता व घामामुळे स्कीन अŸलर्जी होऊ शकते. थोडे सैल कपडे या मोसमात आरामदायक असतात. शिवाय या दिवसात लांब बाह्यांचे कपडे घालावेत. त्यामुळे तुमचे हात उन्हाच्या संपर्कात येणार नाहीत.