सांगली प्रतिनिधी
उमळवाड ता. शिरोळ येथे झालेल्या बैलगाडी शर्यती मध्ये हरिपूर ता. मिरज येथील निशिकांत बोंद्रे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवला त्यांना रोख 51 हजाराचे बक्षीस मिळाले. शर्यतीत उमेश कोळेकर आरेवाडी तर सचिन मोरे जयसिंगपूर यांच्या गाडीने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. बिनदाती बैलजोडी मध्ये हरिपूर येथील दिनकर चौधरी यांच्या गाडीने पहिला संदीप पाटील तासगाव दुसरा, तर संदीप माने यांच्या गाडीने तिसरा क्रमांक मिळवला. आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी जयसिंगपूर चे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, संजय बोरगावे, संजय नांदणे, विद्याधर कर्वे, दिग्विजय बोंद्रे, राजदीप थोरात, सचिन भवरे, प्रभाकर चौगुले, रमेश चौगुले उपस्थित होते.