प्रतिनिधी / मंडणगड
मंडणगड नगर पंचायतीचे प्रभाग आरक्षण जाहीर होऊन आठवडय़ाचा कालावधीत पूर्ण होत आहे या काळात उमेदवारांचे प्रभाग व तिकीट वाचपाची जोरदार राजकीय चर्चा शहरात सुरु असली तरी सत्तेच्या माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार त्यासाठी पडद्यामागील युती अथवा आघाडीचा फॉम्युर्ला कोणता आहे याची गणिते आजही सर्वासमान्यांच्या आवाक्याबाहेरची असताना रातकीय पक्षांकडून यथायोग्य उमेदवारांचे चाचपणीस सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेमुळे पुर्वापार मतदार संघ गायब झाल्याने अनेक पुरुष व स्त्राr नगरसेवकांचा हिरमोड झालेला असताना राजकीय पक्षांनी यथायोग्य गणिते मांडून विजयी उमेदवारांचा शोध पुर्ण केल्याचा व त्यानुसार उमेदवारीचा तयारी सुरु केलेली असल्याचे दिसून येत आहे मंडणगड नगरपंचायतीचे पुढील पाच वर्षातील सत्ताकारणा कोणाच्या माध्यमातून चालणार आहे हे गुपीत व सर्वसामान्यांना अद्याप न उकलले कोडे असले तरी नवीन सत्ताकारणाची गणीते मांडून त्यावर काम करण्यास राजकरण्यांनी सुरुवातही केली आहे नवीन सत्ता कोणाची या प्रश्नांचे उत्तरे सर्वसामान्यांना आजही गुलदसत्यातले वाटत असले तरी विजयासाठी आवश्य़कत असणारा निश्चीत फॉम्यर्ला मांडून त्यावर कामास सुरुवातही झाली आहे याकरिता आवश्यक मतप्रवाह व मतदारांचे मानसिकतेवर प्रभाव टाकणारे फँक्टरही एक ठिकाणी एकवटलेले असल्याने निवडणुका या केवळ औपचारीकता म्हणून बाकी राहील्या आहेत असे वाटते मंडणगड शहरातील पांरपारीक सत्ता केंद्रांना या निवडणुकीत आपला सत्तेतील वाटा विना संघर्ष निश्चीतपणे मिळणार असल्याने पड़द्यामागे सुरु असलेले राजकारण शांतपणे सुरु असले तरी सर्वसामान्य मतदारांकारिता ते अनाकलनीय गुढ असल्यासारखेच वाटत आहे यातही शंका नाही. तत्कालीन समस्या किंवा सत्ता राबविताना सत्ताधायांना आलेले अपयश त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या या निवडणुकांवर फारसा प्रभाव टाकताना दिसून येणार नाहीत पांरपारीत जातीचे गणिते या निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकताना दिसून येतील महाआघाडीचा फॉम्युर्ला स्थानीक राजकारणात उपयोगात येण्यास मोठय़ा अडचणी असल्याने जुने पांरपारीक प्रतिस्पर्घीची कोणत्या कोणत्या माध्यमातून एकमेकांशी स्पर्धा करताना दिसून येणार आहेत व पडद्यामागचे राजकारणही राजकीय तत्वज्ञानाचा आधारा घेवून भविष्यात त्याच दिशेने कूच करताना दिसून येणार आहेत गेल्या पाच वर्षात सत्ता राबविताना विद्यमान सत्ताधायांना साध्यासाध्या विषयावतही अपयश आले आहे पण त्यांचे सत्ता राबवितानाचे अपयश या निवडणुकांतील निवडणुक प्रचाराचा किंवा विरोधाचे भांडवालाचा विषय ठरणार नसून या निवडणुकांत राजकारणी पुन्हा एकदा भावनीक विषयाला हात घालण्याची शक्यता अधिक आहे न झालेली विकासकामे हा निवडणुकांचा मुद्दा नसून अन्य विषयावर प्रकाश टाकूनच निवडणुकांचे राजकारण रंगणार आहे एकंदरीत काय ज्याच्याकडून विजयासाठी मते हवी आहेत तो मतदाराच निवडणुकांतील मुद्यांपासून आजही अनभिज्ञ आहे विद्यमान सत्ताधायांच्या पुर्ण विरोधात मतदार नसल्यानेच अशी परिस्थीती निर्माण झाली असून राजकीय पक्षांची आपल्या सोईचे राजकारण शहर विकासाचे मुद्यावर मंडणगडला मागे टाकणारे वाटत आहे सध्या सर्वच राजकीय पक्ष यथायोग्य उमेदवार व त्यांच्या सुरक्षीत मतदार संघाच्या तयारीत गुंतले आहेत.