प्रतिनिधी / उस्मानाबाद
उस्मानाबाद येथून 59 नमुने तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून सात पॉझिटीव्ह, एक अनिर्णित व ५० निगेटीव्ह असा आहे.
पॉझिटिव्ह पेशंट ची माहिती.
दोन पेशंट तुळजापूर तालुक्यातील असून त्यातील एक प्रॉपर तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉझिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे, दुसरा पेशंट काटगाव ता. तुळजापूर येथील आहे. दोन पेशंट बालाजी नगर उमरगा येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत. तीन पेशंट एमआयडीसी उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या पॉझिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत असे आज एकूण सात बाधित रुग्णांची भर पडली आहे.
एकूण रुग्ण २१७
बरे झालेले रुग्ण १६८
मृत्यु १०
सद्य रुग्ण ३९