गेल्या काही लेखात आपण प्राणिक हीलिंग या पूरक उपचार पद्धतीविषयी थोडक्मयात माहिती घेतली. या लेखात ऊर्जा, ऊर्जादेह व प्राणिक उपचारांविषयी काही माहिती जाणून घेऊया.
आपले ऊर्जाशरीर हे प्राणशक्तीच्या अतिसूक्ष्म ऊर्जाकणांनी बनलेले आहे. या ऊर्जादेहावरील ऊर्जाकेंदे म्हणजेच चक्राद्वारे या ऊर्जाशरीराचे व भौतिक शरीराचे नियंत्रण केले जाते. शरीराला शुद्ध ऊर्जेचा पुरवठा करून दूषित अथवा खराब ऊर्जा शरीराबाहेर टाकण्याचे कार्य या चक्रांमार्फत अविरत चालू असते. भौतिक शरीरात जशा रक्तवाहिन्या असतात त्याचप्रमाणे ऊर्जाशरीरात ऊर्जेच्या प्रवाहासाठी सूक्ष्म जीवद्रव्य मार्ग असतात. याच सूक्ष्मजीवद्रव्य मार्गांना भारतीय योगशास्त्रात ‘नाडी’ असे संबोधले आहे. अत्यंत वेगाने फिरणारी ऊर्जाशरीरावरील चपे ही या सूक्ष्म नाडय़ांमार्फत सबंध शरीरभर प्राणशक्ती पुरवठा करतात. आपल्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी या प्रमुख चक्रांची भौतिक स्तरावरील बाह्य अभिव्यक्ती असून त्यादेखील या कार्यामध्ये सहभागी झालेल्या असतात. अनेक रोगजंतू किंवा रोगग्रस्थ पदार्थांपासून बचावासाठी एक संरक्षक कवच म्हणून हा ऊर्जादेह कार्यरत असतो. एक किंवा अनेक चक्रांची दोषपूर्ण कार्यशैली सुधारण्यासाठी प्राणिक उपचार खालील प्रकारे मदत करतात.
1. सबंध ऊर्जादेहाची व चक्राची स्वच्छता केली जाते. 2. ज्या चक्रांमध्ये दूषित ऊर्जा खूप प्रमाणात साठून राहिली असेल त्या ठिकाणच्या ऊर्जा स्वच्छतेवर भर दिला जातो. 3. अवरुद्ध झालेल्या ऊर्जावहिनी ‘नाडय़ा’ स्वच्छ करून त्यांचे ऊर्जन केले जाते. 4. काही विशिष्ट आजारांसाठी काही विशिष्ट प्रकारच्या प्राणशक्तीचा वापर केला जातो. 5. आवश्यकतेनुसार चक्रांची फिरण्याची गती नियंत्रित केली जाते.
वाचकहो, प्राणिक हीलिंग म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, चक्र म्हणजे काय, ऊर्जेचे प्रकार, ती कुठून आपल्या शरीरात येते, ही पूरक उपचार पद्धती कसे काम करते या सगळय़ाबद्दल आपण माहिती घेतली. आता हीच ऊर्जा तुम्हाला स्पर्श करता आली, अनुभवता आली तर… हो, तुम्ही बसल्या जागी तुमच्या ऊर्जा पाहू शकता, ऊर्जेला स्पर्श करू शकता. यासाठी दोन छोटेसे प्रयोग करूया.
प्रयोग पहिलाः 1. घरातील कोणत्याही एका व्यक्तीला घरातल्या भिंतीला पाठ लावून उभे करा. 2. आता तुम्ही त्या व्यक्तीच्या समोर उभे रहा. 3. आता तुम्ही भिंतीला पाठ लावून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डोक्मयाच्या एक फूट वर एकटक बघत रहा. 4. कमीत कमी 3 मिनिटे एकटक बघा. 5. आता तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती ऊर्जेचे वलय दिसेल. जसा देवघरातील देवांच्या डोक्मयाभोवती प्रकाश दिसतो तसाच प्रकाश किंवा तसेच वलय तुम्हाला दिसेल. असेच ऊर्जेचं वलय तुमच्याभोवती असते. एखाद्या व्यक्तिभोवतीच ऊर्जेचे वलय हे त्याच्या भौतिक शरीराच्या आकाराचेच असते. जसे पाणी आपण माठात टाकले तर ते माठासारखा आकार घेते, टाकीत टाकले तर टाकीचा आकार घेते. अगदी त्याचप्रमाणे जशी आपल्या भौतिक शरीराची रचना असते आपला ऊर्जादेह त्याच आकाराचा असतो.
प्रयोग दुसराः 1. एका जागी स्थिर उभे रहा. 2. तुमची जीभ टाळूला लावा. 3. हाताच्या अंगठय़ानी दोन्ही हाताच्या तळव्याच्या मध्यभागी दाब द्या. 4. याचप्रमाणे प्रत्येक बोटाच्या वरच्या बाजूस दुसऱया हाताच्या बोटांनी दाबा 5. आता दोन्ही हात तीन इंचाच्या अंतरावर समांतर एकमेकांच्या समोर धरा. हाताचे कोपरे शरीरापासून दूर धरा. 6. डोळे बंद करा. 7. हळूहळू श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. ही क्रिया तुम्हाला पाच मिनिटे करायची आहे. 8.श्वसन चालू असताना तुम्हाला तुमचा एक हात हळूहळू घडय़ाळाच्या काटय़ासारखा दुसऱया हाताच्या समोर फिरवायचा आहे. पाचवेळा घडय़ाळाच्या काटय़ासारखा आणि पाचवेळा जसा आता हात फिरवला आहे तसा उलटय़ा दिशेने. ही क्रिया चालू असताना तुमचे हात समोरासमोर असतील याची काळजी घ्या. 10. एक हात झाला की दुसरा हातही अशाच पद्धतीने फिरवायचा आहे. हात अत्यंत सावकाश फिरवला तरच ऊर्जेचा स्पर्श तुम्हाला जाणवू शकतो.
11. हात फिरवताना तळव्याच्या मध्यभागी आणि बोटांच्या टोकावर म्हणजेच आपण जिथे जिथे दाब दिलेला त्या ठिकाणी लक्ष ठेवायचे आहे, जागरूक रहायचे आहे. हा प्रयोग केल्यावर तुम्हाला दोन तळहाताच्या मध्ये एक फुगा आहे, हवेचा दाब आहे, टोचल्यासारखे वाटते किंवा गरम वाटते यापैकी किंवा यापेक्षा वेगळे काहीही जाणवू शकते. ही जाणीव म्हणजेच तुम्ही तुमच्या ऊर्जेला केलेला स्पर्श आहे. विज्ञान इतके पुढे गेले आहे की आजच्या युगात तुम्ही कर्लीयन व पी.आय.पी फोटोग्राफीद्वारे तुमच्या ऊर्जाशरीराचे फोटोही काढू शकता. तुमच्या ऊर्जाशरीरात कुठे बिघाड झाला आहे हे त्यावरूनही कळू शकते. ऊर्जादेह आपण अनुभवला आता पाहूया या ऊर्जादेहावर नेमक्मया कोणत्या गोष्टी परिणाम करतात.
आपल्या चुकीच्या आहार-विहार व संस्कार (उदा. असंतुलित आहार व त्याच्या अनियमित वेळा, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव, प्रदूषित वातावरण, स्ट्रेस, नैराश्य व धावपळ) यामुळे ऊर्जावाहिनी नाडय़ांमध्ये अडथळा निर्माण होतो, तिथे हळूहळू ऊर्जेची कमतरता भासू लागते. दुखणे-खुपणे वा अस्वस्थ जाणवू लागते. वेळीच उपचार केले नाहीत तर या त्रासाचे रूपांतर व्याधीत किंवा रोगामध्ये होते. आता तुम्हाला जर व्याधी असेल तर नेमक्मया कोणत्या गोष्टीचा तुमच्या ऊर्जादेहावर परिणाम झाला आहे हे आता तुम्हीच तपासून पहा. आज जर तुमच्या घरी पाणी आले नसेल आणि हा विचार तुम्ही दिवसभर करत राहिलात तरीदेखील तुमच्या ऊर्जादेहावर परिणाम होऊ शकतो. विज्ञान सांगते की माणसाला 90… आजार हे मानसिक असतात. छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा प्रमाणापेक्षा जास्त केलेला विचार मोठय़ा मोठय़ा आजारांना आमंत्रण देऊ शकतो. आपल्या शरीराला बराचसा त्रास आपणच नकळतपणे देत असतो. ज्या गोष्टीकडून आपण जितक्मया जास्त अपेक्षा ठेवू तितकाच आपण आपल्या ऊर्जादेहावर जास्त परिणाम होऊ देतो. अत्यंत सूक्ष्म विचार तुमच्या ऊर्जादेहावर परिणाम करत असतो. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली, आपले एखादे माणूस आपल्याशी खोटे बोलले की लगेचच आपला पारा चढतो समोरचा माणूस असा का वागला हा प्रश्न न करता हे वागणे चुकीचेच आहे हा विचार आपण आपल्या मनाशी ठाम करतो आणि आपला राग शांत होत नाही तोवर तोंडाचा पट्टा चालू आणि हातात येईल ती वस्तू आपण आपटत सुटतो. 90 टक्के लोकांच्या बाबतीत हे असेच होते. पण येणाऱया प्रत्येक समस्येवर तुम्ही जी दिसते त्या बाजूचा विचार न करता जी बाजू दिसत नाही त्या बाजूचा जर विचार केलात तर नक्कीच तुमच्या ऊर्जादेहातील चांगली ऊर्जा भरभर खर्च होणार नाही, राग, चिडचिड यामुळे निर्माण होणारी दूषित ऊर्जा तयार होणार नाही आणि ती तुमच्या ऊर्जादेहात साचूनही राहणार नाही. परिणामी तुमचे ऊर्जाशरीर हे चांगल्या ऊर्जेने भरून राहील आणि तुमचे ऊर्जाशरीर सुदृढ असल्याने तुमचे भौतिक शरीर, मानसिक शरीरही उत्तम राहील. तर मग आजपासूनच समोर येणाऱया प्रत्येक गोष्टीचा न दिसणाऱया बाजूचा विचार करून बघूया. ऊर्जादेहाला स्पर्श करत राहूया. आपली ऊर्जा अनुभवत राहूया.
आज्ञा अभिषेक कोयंडे