नवी दिल्ली
सुटय़ा भागांच्या टंचाईमुळे ऍपलला मॅकबुकच्या निर्मितीमध्ये अडचणी जाणवत आहेत. कंपनीच्या आयपॅड उत्पादनावर परिणाम होत आहे.
सदरच्या दोन्ही उत्पादनांसाठी लागणाऱया महत्त्वाच्या कच्च्या घटकाची टंचाई कंपनीला जाणवते आहे. कच्च्या भागाच्या अनुपलब्धतेमुळे ऍपल कंपनीला सध्याच्या घडीला उत्पादनांची जोडणी व निर्मिती करणे कठीण जात आहे. त्यामुळे नजिकच्या काळामध्ये मॅकबुक व आयपॅड यांचा वेळेत पुरवठा करणे जड जाणार आहे.