18 लाख कोटी मूल्याची नोंद : वित्त वर्ष 2019मधील फोर्ब्सची यादी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फोर्ब्सने वित्त वर्ष 2019 मधील जगातील पहिल्या 100 सर्वोच्च मूल्य असणाऱया ब्रँडची सूची नुकतीच सादर केली आहे. या यादीनुसार ऍपल जवळपास 18 लाख कोटीच्या मूल्यासोबत जगातील सर्वोच्च ब्रँड बनला आहे. मागील एक वर्षामध्ये ऍपलचे मूल्य 17 टक्क्मयांनी वाढत गेले असल्याची माहिती असून 24 टक्क्मयांच्या वाढीसोबत गुगल या स्पर्धेत दुसऱया स्थानी आहे.
एकूण शंभर ब्रँडच्या यादीत प्रामुख्याने गुगल 15 लाख कोटीच्या मूल्यासोबत gदसऱया नंबरवर असून मायक्रोसॉफ्ट 30 टक्क्मयांच्या वाढीसोबत 12 लाख कोटीच्या बाजारमूल्यासोबत तिसऱया स्थानी आहे. मूल्यवान ब्रँडच्या यादीत अमेरिकन कंपन्यांचा 50 टक्केपेक्षा अधिकचा वाटा आहे. यातील पाच ब्रँड हे दिग्गज टेकचे आहेत तर सर्व कंपन्यांमध्ये 20 कंपन्या टेक क्षेत्रांशी संबंधीत आहेत. 14 फायनान्शिअल सर्व्हिसमधील आहेत.
पहिल्या 100 मध्ये भारत
सदर यादीमध्ये एकाही भारतीय कंपनीचा समावेश नसल्याची माहिती आहे. परंतु यातील फॉक्सवॅगन कंपनीही 100 व्या स्थानी असून यांचे मूल्य 59 हजार कोटी रुपये आहे. यामुळे येत्या काळात भारतीयांनी योग्य ती कामगिरीची नोंद करत पहिल्या शंभरात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.