प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या ऍप्टेक एव्हीएशन अकॅडमीतील अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांमध्ये दाखल झाले असल्याने बेळगाव जिल्हय़ातील विद्यार्थ्यांनी ऍप्टेक एव्हीएशन येथे प्रशिक्षण घेऊन आपले करिअर व उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन अकॅडमीचे संचालक विनोद बामणे यांनी केले.
अकॅडमीच्यावतीने 6 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ग्रामीण व स्थानिक भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी निवड केली आहे. मुंबई येथे मुख्यालयासह ऍप्टेक लि. ही एक जागतिक रिटेल आणि कार्पोरेट प्रशिक्षण संस्था आहे. कंपनीने 1986 मध्ये आपला आयटी प्रशिक्षण व्यवसाय सुरू केला. उत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्डसह 6.4 दशलक्ष विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ऍप्टेकची भारतभर 1300 हून अधिक केंदे असून, 2007 मध्ये स्थापन झाल्यापासून जवळपास 70 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे, असे ऍप्टेक बेळगावचे विनोद बामणे यांनी सांगितले.