20 हजार नवीन लोकांना रोजगाराचे संकेत : विशेष कौशल्य आवश्यक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊनचा वाढता कालावधी आणि कोविडच्या संसर्गामुळे जगभरातील रोजगाराच्या संधी आक्रसल्या असून नव्याने रोजगाराची शक्मयता कमी असल्याचे तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. परंतु दुसऱया बाजूला ऍमेझॉन इंडियासारख्या ऑनलाईन व्यापारात कार्यरत असणाऱया कंपनीने जवळपास 20 हजार नवीन लोकांना रोजगार देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
कंपनीकडून प्रामुख्याने हैदराबाद, पुणे, कोइमतूर, कोलकाता, जयपूर, चंदीगढ, मेंगलोर, इंदोर, भोपाळ आणि लखनऊ आदी शहरांमध्ये कर्मचारी भरती केली जाणार आहे. यात जास्ति जास्त वर्चुअल कस्टमर सेवा प्रोगॅमचा हिस्सा असून यामध्ये वर्क फ्रॉर्म होमसाठीही पर्याय दिला आहे. सदर पदांसाठी उमेदवारांना 12 वी पास असणे बंधनकारक आहे.
यामध्ये विविध माध्यमातून ईमेल, चॅट, सोशल माध्यम आणि फोन यांच्या आधारे काम करण्याचा अनुभव आवश्यक आहे. तसेच इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू किंवा कन्नड भाषेचे कौशल्य असणे आवश्यक असून यांच्या मदतीने घर आणि कार्यालयात काम करण्याची संधीदेखील उमेदवारांना मिळणार आहे.
ग्राहकांची ऑनलाईन खरेदीला वाढती पसंती लक्षात घेऊन कंपनीने नव्याने उमेदवार भरतीचे नियोजन केले आहे. जास्तीत जास्त जणांना कंपनीत योग्यतेनुसार सामावून घेतले जाणार असल्याचे ऍमेझॉन इंडियाचे कस्टमर सर्व्हिसेस संचालक अक्षय प्रभू यांनी सांगितले आहे.
2025 पर्यंत 10 लाख रोजगार
चालू वर्षातील रोजगार निर्मितीनंतर येत्या 2025 पर्यंत 1 दशलक्ष पेक्षा अधिकच्या नवीन नोकऱया उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे
ऍमेझॉनने स्पष्ट केले आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, रिटेल, लॉजिस्टीक आणि निर्मिती क्षेत्रांमध्ये रोजगार देण्यावर ऍमेझॉन भर देणार असल्याचे म्हटले आहे.