वृत्तसंस्था/ मियामी
जागतिक अग्रमानांकित ऍश्ले बार्टीने येथे सुरू असलेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
बार्टीने तीन सेट्सच्या लढतीत बेलारुसच्या सातव्या मानांकित ऍरीना साबालेन्काचा सव्वा दोन तासांच्या खेळात 6-4, 6-7 (5-7), 6-3 असा पराभव केला. पुढील फेरीत तिची लढत ऍनास्तेशिया सेवास्तोव्हा किंवा युपेनची एलिना स्विटोलिना यापैकी एकीशी होईल. दुसऱया सेटमधील टायब्रेकरमध्ये बार्टीने 3-1 अशी आघाडी घेतल्यानंतर याच सेटमध्ये सामना संपणार असे वाटत होते. पण साबालेन्काने जोरदार मुसंडी मारत हा टायब्रेक 7-5 असा घेत बरोबरी साधली होती. तिसऱया सेटमध्ये मात्र बार्टीने तिला फारशी संधी दिली नाही.