प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरातील ऍस्टर आधार हॉस्पिटलने सुरू केलेला `ऍस्टर फ्री इन’ उपक्रम गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरेल. सिटी स्कॅनद्वारे रोगनिदान मोफत होणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शास्त्रीनगर येथील ऍस्टर आधार हॉस्पिटलने दारिदÎरेषेखालील रूग्णांच्या रोगनिदानासाठी ऍस्टर फ्री इन योजना सुरू केले. त्याचा लोकार्पण सोहळा येथील पंचशील हॉटेलमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. उल्हास दामले होते. यावेळी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मोटे, डॉ. संजय देशपांडे, रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. संतोष सरुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या योजनेंतर्गत वर्षभर गरजू, गरीब 1 हजार रुग्णांचे सिटीस्कॅन मोफत केले जाणार असल्याची माहिती आनंद मोटे यांनी दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ऍस्टर आधार ही जगातील दर्जेदार वैद्यकीय व्यवस्था आहे. गरजू रुग्णांचे योग्य निदान, उपचार हे ऍस्टर व्हॉलिंटीअर विभागाच्या ऍस्टर फ्री इन योजनेचे उद्दिष्ट आहे. ऍस्टर डीएम हेल्थकेअरचे चेअरमन, कार्यकारी संचालक डॉ. आझाद मोपेन यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीतून हा लोकोपयोगी उपक्रम पुढे आला. ऍस्टर डी.एम. हेल्थकेयर संस्था 34 वर्षे गुणवत्तापूर्वक आरोग्यसेवेबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. या योजनेसाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला घ्यावा, अशी सुचनाही त्यांनी केली.
हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. उल्हास दामले म्हणाले, दुबईमध्ये मुख्यालय असणाऱया या संस्थेची जगभरात 7 देशांत 356 ठिकाणी हॉस्पिटल, क्लिनिक, फार्मसी आहेत. भारतातील 14 हॉस्पिटलमध्ये कोल्हापुरातील ऍस्टर आधार आहे. हॉस्पिटलच्या पथकाने तमीळनाडूतील नैसर्गिक आपत्तीत कोल्हापुरात 2019 च्या महापुरात सेवा दिली आहे. अशा सामाजिक बांधिलकीतून हॉस्पिटलने ऍस्टर फ्री इन योजना आणली आहे. त्याचा रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ऍस्टर डी एम हेल्थकेयरचे चेअरमन, डॉ. आझाद मोपेन यांनी दुबईवरून पाठवलेल्या व्हिडिओ संदेशात `ऍस्टर फ्री इन’ मोफत इन्व्हेस्टिगेशन’ उपक्रम लोकार्पण करत आहोत. `ऍस्टर व्हॉलेंटियर’ ही समाजसेवेची शाखा आहे. त्या अंतर्गत समाजाला गरजेवेळी मदत करण्याच्या भुमिकेतून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. जगात 27 हजारांहून जास्त व्हॉलेंटियर कार्यरत आहेत. 3 वर्षपूर्वी केरळमधील महापुरावेळी मदतीसाठी कोल्हापुरातील ऍस्टर व्हॉलेंटियर धावून आले होते. ऍस्टर फ्री इन मोफत इन्व्हेस्टिगेशन अंतर्गत कोल्हापुरात डिसेंबरपर्यंत गरजू रुग्णांसाठी मोफत सीटी स्कॅन केले जाणार असल्याचे सांगितले.
डॉ. उल्हास दामले यांनी स्वागत केले. सीईओ आनंद मोटे यांनी प्रास्ताविक पेले. आनंद माने यांनी आभार मानले.