वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारती एअरटेल आपली डायरेक्ट-टू-होम (डिटीएच) सहकारी भारती टेलिमीडियामधील 20 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. ही हिस्सेदारी वारबर्ग पिंकसमधून खरेदी करण्यात येणार आहे. या हिस्सेदारीसाठी दोन कंपन्यांमध्ये 3,126 कोटी रुपयांमध्ये व्यवहार होणार आहे. वारबर्ग पिंकस यांनी टेलिमीडियाची ही 20 टक्के हिस्सेदारी 2017 मध्ये 2,258 कोटी रुपयांना खरेदी केली होती.
या व्यवहारामध्ये भारतीय एअरटेल वारबर्ग पिंकसला 600 रुपये प्रति समभाग या हिशोबाने 3.64 कोटीचे इक्विटी समभाग सादर करणार आहे. या समभागाचे फेस मूल्य 5 रुपये राहणार असून जे 595 रुपयाच्या प्रीमियमसोबत सादर केले जाणार आहे. यासोबत भारती एअरटेल 1,037.8 कोटी रुपयांचे रोख पेमेंट करणार आहे.
डिटीएचजवळ 1.7 कोटीपेक्षा अधिक सबस्क्राइबर
भारती एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार वारबर्ग पिंकसशी जोडलेल्या लियोन मिडो इन्वेस्टमेंट लिमिटेडला जवळपास 0.5 टक्के प्रीमियमवर समभाग सादर करणार आहे. 937.8 कोटी रुपयांची रक्कम ही व्यवहारावेळी रोख स्वरुपात देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 31 मार्च 2020 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात भारती टेलिमीडियाची उलाढाल 2,923.8 कोटी रुपयांची होती.