दुबई
4 सप्टेंबरला जयपूरहून दुबईला पोहोचलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानामध्ये एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर दुबई सिव्हिल एव्हिएशन ऍथॉरिटीने दुबईला एअर इंडिया एक्सप्रेसची उड्डाणे 2 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली आहेत. ही बंदी 18 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत (14 दिवस) लागू राहील. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार जयपूरहून दुबईला गेलेल्या या प्रवाशाची जयपूरमध्येच 2 सप्टेंबर रोजी कोरोना चाचणी झाली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसमधील पॉझिटिव्ह प्रवासी दुबईला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. एअर इंडियाला संबंधित प्रवाशांच्या उपचार आणि अलग ठेवण्याच्या सुविधांवरील खर्चाची भरपाई देखील करावी लागणार आहे.