जवानाला केलेल्या मारहाणीचा रमेश जारकीहोळींकडून निषेध
प्रतिनिधी/ बेळगाव
एकसंबा, ता. चिकोडी येथे पोलीस व सीआरपीएफच्या जवानामध्ये झटापट झाली होती. या प्रकरणाला कलाटणी मिळत चालली असून वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी पोलिसांची बाजू उचलून धरली आहे. तर पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी जवानाला झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी यासंबंधी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. या घटनेसंबंधी एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. 23 एप्रिल रोजी एकसंबा येथे कोरोना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे. हे पोलीस जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे पालन करण्यास सांगत होते. त्यांना मारहाण झाल्याचे पोलीसप्रमुखांनी सांगितले आहे.
सीआरपीएफचा जवान सचिन सावंत हा 5 ते 6 जणांसमवेत बोलत थांबला होता. त्याने मास्क परिधान केला नव्हता. पोलिसांनी विचारणा केल्यामुळे त्याने पोलिसांवर हल्ला केला आहे. एका पोलिसाच्या पोटावर लाथ मारली आहे. व्हिडिओ चित्रफितीत हा सारा प्रकार स्पष्टपणे दिसतो. तरीही सोशल मीडियावर अवास्तव माहिती पसरविण्यात येत असल्याचे पोलीसप्रमुखांनी सांगितले आहे.
सदलगा पोलीस स्थानकात या जवानावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनीही सोमवारी सायंकाळी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून यामध्ये संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली आहे. सचिन सावंत याच्यावर एफआयआर दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती कमांडंट कोब्रा युनिट 207 बटालियनला देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर सीआरपीएफच्या जवानाला बेडय़ा घातल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. यासंबंधी पाटबंधारेमंत्री रमेश जारकीहोळी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून केवळ मास्क परिधान केला नाही म्हणून जवानाला बेदम मारहाण करून त्याला बेडय़ा ठोकणे योग्य नाही. तो देशरक्षण करणारा एक जवान आहे, याचाही विचार न करता एका सामान्य गुन्हेगारासारख्या त्याच्या हाताला बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. याचे कोणीही समर्थन करू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एका निरपराध जवानाला मारहाण करून त्याला अटक करणे म्हणजे सैनिकांचा केलेला अपमान आहे. त्वरित त्याची सुटका करावी. जवानाला मारहाण करणाऱया पोलिसांवर कारवाई करावी, यासाठी आपण मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले आहे. या प्रकरणाला कलाटणी मिळत चालली आहे.