सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी-
लंडन, अमेरिकेमध्ये यशस्वीपणे प्रयोग केल्यानंतर महाराष्ट्रभर गाजत असलेले `एका लiनाची पुढची गोष्ट’ हे नाटक लॉकडाऊन नंतर कोकण दौऱयावर प्रथमच येत आहे. आतापर्यंत 439 प्रयोग झाले असून लवकरच या नाटकाचा 500 वा प्रयोग केला जाणार आहे. या नाटकामध्ये सर्वच कालाकार टिमवर्क म्हणून काम करत असून प्रत्येक नाटय़प्रयोग हाऊसफूल होत असून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे हे नाटक आहे. त्यामुळे नाटय़रसिक नाटक पाहून बाहेर पडल्यानंतर निश्चितपणे प्रेक्षकांचा चेहरा प्रफुल्लित झालेला असेल, असा विश्वास नाटय़अभिनेता व नाटकाचे निर्माते प्रशांत दामले व अभिनेत्री कविता लाड यानी ऑनलाईन पत्रकार पाfरषदेत व्यक्त केला
या नाटकाचा डिसेंबर माfहन्यात कोकण दौरा असून सोमवार, 6 रोजी रात्री 10 वाजता बादल हायस्कूल सभागृह, चिपळूण. मंगळवार, 7 रोजी रात्री 10 वाजता स्वा सावरकर नाटय़गृह, रlनागिरी. बुधवार, 8 रोजी रात्री 10 वाजता मराठा मंडळ हॉल, कणकवली. गुरुवार, 9 रोजी रात्री 10 वाजता बाबा वर्दम रंगमंच, कुडाळ. शुक्रवार, 10 रोजी रात्री 10 वाजता रसिकरंजन नाटय़मंदिर, दापोली. शनिवार, 11 रोजी रात्री 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक नाटय़गृह, महाड असा कोकण दौरा आहे.