बेळगाव :/ प्रतिनिधी
बेळगावच्या एक्स फिटनेस क्लबच्या सदस्यांनी हिमालय पर्वत रांगेमधील ब्रह्मताल पर्वत शिखर यशस्वीरित्या पादाक्रांत केला. ब्रह्मताल हा पर्वत उत्तराखंड राज्यामधील लोहाजंग या ठिकाणी असून समुद्र सपाटीपासून 12250 फूट या पर्वताची उंची आहे. या पर्वतावरून भारत देशामधील महत्त्वाचे मानले जाणारे त्रिशुल पर्वत, नंदागुंटी पर्वत, हाथी पर्वत, देवतोली, मैकोतोली, बेहरोतोली या पर्वतांची नयनरम्य दृश्यही पहायला मिळतात. तसेच ही आशिया खंडमधील सर्वात लांब पर्वतरांग मानली जाते. बेळगावच्या एक्स फिटनेस क्लबच्या सदस्यांनी ही मोहीम यशस्वी केली.
पर्वताची खडतर वाट पादाक्रांत करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागली असून गेल्या 3 महिन्यांपासून गुपचे संचालक डेलमन जेविअर यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक सराव केला. ब्रह्मताल पर्वत शिखराची चढाई ही 4 दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण झाली. या मोहिमेमध्ये बेळगावचे डेलमन जेविअर, निधी मकदूम, जगदीश देसाई, भूषण देसाई, कादंबरी देसाई, प्रकाश देसाई, डेन्स्टन जेविअर, नंदिनी भट, राजमोहन नायक, श्रीनिवास अंगडी, सुहास पाटील, सौजन्य शिलकी गुप्ता, गौरी पाटील, रिषद, पूर्वा सोळंकी पाटील, वैष्णवी भोसले, अश्विनी शांताकुमार, आदर्श मुरगोड, रोशन सिंघानिया, तेजस पांडे, कनिष्क, प्रतीक. स, चिराग का, यांनी सहभाग दर्शविला.