प्रतिनिधी/ रत्नागिरी
नॅशनल डिफेन्स ऍपॅडमी आणि नेव्ही ऍपॅडमीच्या परीक्षार्थींच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 3 विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत़ मुंबई ते सावंतवाडी, मुंबई ते मडगाव आणि कोल्हापूर ते मडगाव या मार्गावर विशेष गाडय़ा धावणार आहेत. परीक्षेसाठी उपस्थित राहू इच्छीणाऱया परीक्षार्थींना या विशेष गाडय़ांचा उपयोग होणार आहे. अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आह़े
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी या मार्गावर 6 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता विशेष गाडी (क्र. 01135/01136) सुटणार आहे. ही गाडी दुसऱया दिवशी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी परतीच्या प्रवासासाठी निघेल आणि रात्री 11 वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबेल. ही गाडी 24 डब्यांची असेल.
परतीच्या प्रवासासाठी ही गाडी 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता निघेल आणि 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगाव आणि लोंढा या स्थानकांवर थांबून मडगावला पोहोचणार आहे. ही गाडी 22 डब्यांची आहे.