लाखो रुपयांचा ड्रग्स जप्त – अभिनेता अर्जुन रामपालच्या मैत्रिणीच्या भावासह चार जणांना अटक
प्रतिनिधी/ पणजी
नार्कोटिक कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) गोवा विभागाने ड्रग्स विरोधी प्रकरणात गोव्यात विविध ठिकाणी छापे मारून बॉलीवूड कलाकार अर्जुन रामपाल याच्या मैत्रिणीच्या भावासह चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचा चरस, हॅशिश व इतर विविध प्रकारचा ड्रग्स जप्त केला आहे. चौघांनाही रिमांडसाठी न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
संशयित ऍजीसीलावोस डेमेट्रीदेस हा बॉलीवूड कलाकार अर्जुन रामपाल याच्या मैत्रिणीचा भाऊ आहे, अशी माहिती एनसीबी गोवा विभाग अधिकारी समीर वानखडे यांनी दिली आहे. संशयित मूळ दक्षिण आफ्रिका येथील असून गेल्या काही महिन्यांपासून तो चोपडे-पेडणे येथे एका भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याच्यासह नौमान सवेरी (22 मूळ छत्तीसगड, सध्या रा. शिवोली) सिद्धिकी अहमद (25 हैदराबाद) मयूर मोहनानी (मुंबई) यांचा समावेश आहे.
संशयित ऍजीसीलावोस डेमेट्रीदेस याला यापूर्वी एनसीबीने तीनवेळा अटक केली आहे. बॉलीवूड कलाकार स्व. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातही त्याला एनसीबीने अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. ऍजीसीलावोस याला अटक केल्यानंतर अर्जुन रामपाल व त्याची मैत्रिण
गॅब्रिएला याचीही उलट तपासणी केली होती. तसेच त्याच्या मुंबई बांद्रा येथील घराची तपासणी केली होती.