शनिवारी भाजीपाला दर स्थिर : बटाटा दरात 100 रु.नी वाढ : कमी आवकेमुळे काही भाज्या वधारल्या
वार्ताहर / अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांद्याचा भाव प्रति क्विंटल दोनशे रुपयांनी कमी झाला आहे. भाजी मार्केटमध्ये काही भाजीपाल्याचे दर स्थिर तर काही भाजीपाल्यांचे भाव वाढले आहेत. बटाटय़ाचा भाव 100 रुपयांनी वाढला आहे.
इंदोर बटाटा आवक बाजारात कमी प्रमाणात आहे. जवारी बटाटय़ाला अळीचे प्रमाण असल्याने तो लवकर खराब होत आहे. यामुळे बेळगाव, कारवार, गोवा आदी ठिकाणचे खरेदीदार इंदोर बटाटा खरेदी करत असल्याने इंदोर बटाटय़ाचा भाव प्रति क्विंटल शंभर रुपयांनी वाढला आहे.
शुक्रवारी होळी सणानिमित्त हॉटेल आणि इतर छोटे, मोठे बाजार बंद होते. यामुळे शनिवारी बाजारात खरेदीदार कमी आल्याने कांद्याचा भाव प्रति क्विंटल 200 रुपयांनी कमी झाला आहे.
सध्या उष्म्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे भाजीपाला आवक बाजारात कमी येत आहे. यामुळे भाजी मार्केटमध्ये काही भाज्यांचे दर वाढले आहेत, अशी माहिती भाजी व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी
दिली.
शनिवारी बाजारात महाराष्ट्र कांद्याच्या 30 ट्रक व पांढऱया कांद्याची एक ट्रक आवक होती. इंदोर बटाटा पाच ट्रक आवक होती. तालुक्यातील जवारी बटाटय़ाची 500 पिशव्या आवक झाल्याची माहिती अडत व्यापारी कल्लाप्पा गडकरी यांनी दिली.
भाजीपाला शेकडा भाव
मेथी….. 1200 ते 1400 रु.
शेपू………. 400 ते 500 रु.
पालक…… 300 ते 400 रु.
कांदापात… 250 ते 300 रु.
घटप्रभा कोथिंबीर 1000 ते 1200 रु.
बेळगाव कोथिंबीर 500 ते 900 रु.
लाल भाजी 400 ते 500 रु.
जवारी बटाटा भाव प्रति क्विंटल
गोळी……. 400 ते 600 रु.
मीडियम 1000 ते 1500 रु.
मोठवड. 1500 ते 1700 रु.
गोळा… 1700 ते 1800 रु.
इंदोर बटाटा 1700 ते 1800 रु.
महाराष्ट्र कांदा प्रति क्विंटल
गोळी….. 700 ते 1000 रु.
मीडियम 1200 ते 1500 रु.
मोठवड. 1500 ते 1600 रु.
गोळा… 1600 ते 1800 रु.
पांढरा कांदा 1000 ते 1500 रु.
भाजीपाला प्रति दहा किलो
ढबू मिरची 530 ते 600 रु.
इंदस ढबू मिरची 450 ते 500 रु.
बिन्स……. 300 ते 400 रु.
कारली…… 350 ते 420 रु.
दोडकी…… 200 ते 220 रु.
कोबी………. 90 ते 100 रु.
इंग्लिश गाजर 300 ते 320 रु.
भेंडी……… 250 ते 300 रु.
बिट………. 100 ते 120 रु.
जवारी काकडी 200 ते 250 रु.
आले…….. 300 ते 320 रु.
मटार……. 550 ते 600 रु.
हिरवी मिरची 900 ते 1000 रु.
जी-फोर मिरची 1150 ते 1200 रु.
दुधी भोपळा डझन 180 ते 200 रु.
टोमॅटो प्रति ट्रे 100 ते 180 रु.
मालिनी पांढरी काकडी 200 ते 250 रु.
गोल भोपळा प्रतिक्विं.1800 ते 2000 रु.