प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन क्लोजडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे एपीएमसी भाजीमार्केट सीलडाऊन करण्यात आले असून तेथील अधिकृत विपेत्यांनी संडेमार्केटच्या खुल्या जागेत विक्री व खरेदी करण्याचा आदेश बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी दिला आहे.
भाजी मार्केटची वेळदेखील बदलून देण्यात आली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत त्यांना ही विक्री करता येणार आहे. एपीएमसीमध्ये जे भाजी विपेते गाळेधारक आहेत त्यांनी संडे मार्केटमधील खुल्या जागेत स्थलांतरित होऊन त्या ठिकाणीच हा व्यवसाय करायचा आहे.
एपीएमसी मार्केटयार्डमध्ये ऑटोरिक्षांना तसेच दुचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. किरकोळ विपेत्यांना ओळखपत्राद्वारेच आत प्रवेश दिला जाणार आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर 2005 च्या भा.दं.वि. कलम 188 आणि कर्नाटक संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा 2020 नुसार कारवाई केली जाईल, असे एपीएमसी सचिवांनी बजावलेल्या आदेशात म्हटले आहे.