प्रतिनिधी/ सातारा
ऊस उत्पादक शेतकरी संघटना व सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन आणि कार्यकारी संघटना यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. सदर बैठक बुधवार दि. 27 रोजी दुपारी 12 वा. नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे बोलाविण्यात आली आहे. प्रारंभी सदर बैठकीचे नियोजन हे सोमवार दि. 25 रोजी करण्यात आले होते. पण काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन यावेळी एफआरपी रक्कम आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे.