ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे येथील एनवायसीएस अर्थात, नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने ‘एमएसएमई (सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) क्षेत्रातील नव्या संधी’ या विषयावर शनिवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सांयकाळी 6 वाजता NYCSIndia या फेसबुक पेज वर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये वेबिनारमध्ये केंद्रिय रस्ते वाहतूक आणि परिवहन तसेच सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचा प्रमुख सहभाग असणार आहे.
तसेच एन. वाय.सी. एस.चे अध्यक्ष प्रकाश चन्द्र साहू आणि एन.वाय.सी. एस.चे चेअरमन राजेश पांडे हे देखील ह्यात विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन एनवायसीएस कडून करण्यात आले आहे.