नवी दिल्ली
जागतिक पातळीवर सेमीकंडक्टरच्या तुटवडय़ाचा परिणाम ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठय़ा प्रमाणात सोसावा लागत आहे. सदरचा परिणाम एमजी मोटर इंडिया यांनाही बसला असून येणाऱया काळात कार वितरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याचे समजते.
एमजी मोटर इंडियाचे विक्री विभागाचे संचालक राकेश सिदना यांनी सांगितले की, सेमीकंडक्टर चिपच्या टंचाईमुळे येणाऱया काळामध्ये कंपनीच्या वितरण व्यवस्थेवरचा ताण वाढणार असून पुरवठय़ात कपात होण्याची शक्मयता आहे. ऑटो कंपन्यांना सध्या जागतिक स्तरावरच्या सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. याचा फटका आपल्या कंपनीलाही बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी लागत आहेत. सेमीकंडक्टरच्या अभावामुळे कारच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.