बेळगाव : बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एम. बी. बोरलिंगय्या यांची नेमणूक करण्यात आली आहे. शुक्रवारी 31 डिसेंबर रोजी रात्री यासंबंधीचा आदेश देण्यात आला आहे. डॉ. त्यागराजन यांची बदली बेंगळूरच्या पोलीस भरती विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी (डीआयजीपी) करण्यात आली आहे. बेळगावमध्ये अलीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना कायदा-सुव्यवस्था हाताळण्यात डॉ. त्यागराजन यांना अपयश आले होते. या कारणामुळे राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केल्याचे समजते.
Previous Articleनववर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने
Next Article LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.