वृत्तसंस्था/ मुंबई
रिटेल स्टोर साखळीतील डिमार्टची सहकारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्टने 2020-21 आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीअखेर 414 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला असून जो मागच्या तिमाहीच्या तुलनेत 52 टक्के इतका अधिक राहिला आहे.
एक वर्षापूर्वी समान कालावधीत कंपनीचा नफा 271 कोटी रुपये इतका राहिला होता. एव्हेन्यू सुपरमार्टचे संस्थापक शेअरबाजारातील आघाडीवरचे गुंतवणूकदार राधाकिशन दमानी हे आहेत. मार्च तिमाहीतील महसूल 18 टक्क्यांनी मागच्या वर्षाच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले आहे. कंपनीचा महसूल 7 हजार 411 कोटी रुपये इतका राहिला आहे, जो एक वर्षापूर्वी समान कालावधीत 6 हजार 256 कोटी रुपये इतका होता. डिसेंबर 2020 च्या तुलनेत एव्हेन्यू सुपरमार्टच्या नफ्यात 7 टक्के इतकी कमी दिसली.