मुंबई
रंग उत्पादक कंपनी एशियन पेंट्सला सप्टेंबर 2020 अखेर संपलेल्या तिमाहीत चांगली कामगिरी करता आली आहे. कंपनीच्या रंगविक्रीत दोन अंकी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. सप्टेंबर 2020 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 1 टक्के वाढून 851.9 कोटी रुपयांवर आला. कंपनीच्या महसुलातही 5.9 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा सध्याचा महसूल 5350.2 कोटींवर आला आहे.