मुंबई
रंग उत्पादक कंपनी एशियन पेंट्सच्या समभागाच्या भावामध्ये शुक्रवारी इंट्राडे दरम्यान 6 टक्के इतकी घसरण नेंदविण्यात आली. कंपनीच्या समभागाचा भाव सदरच्या सत्रामध्ये 2692 रुपयांवर बीएसईवर व्यवहार करत होता. गेल्या तीन दिवसांच्या सत्रामध्ये कंपनीच्या समभागाच्या भावामध्ये 15 टक्के इतकी घट दिसून आली. विक्रीच्या दबावामुळे समभागाच्या भावाने घसरण अनुभवली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचाही परिणाम कंपनीवर दिसून आला.
–