हिंडलगा पंपहाऊसमधील पाणी ओसरल्यानंतरच पाणीपुरवठा होणार सुरळीत : हिडकलचाही पाणीपुरवठा बंद
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया हिंडलगा पंपहाऊसमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळय़ात शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशातच कुंदरगी पंपहाऊसमध्ये पाणी शिरल्याने हिडकल जलाशयाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी शहरवासियांच्या समस्येत आणखी भर पडली आहे.
मागील चार दिवसांपासून शहर व उपनगरांमध्ये तसेच राकसकोप जलाशय, हिडकल जलाशय, पाणलोट परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. राकसकोप जलाशय तुडुंब भरल्याने अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यात आले आहे. परिणामी मार्कंडेय नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे हिंडलगा पंपिंगहाऊसमध्ये पाणी शिरले असून विद्युतपंप बंद ठेवण्यात आले आहेत. पाण्यामुळे विद्युतपंप खराब होण्याची शक्मयता असल्याने सदर पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
पूरपरिस्थितीचा फटका
तसेच तुम्मरगुद्दी पंपिंगहाऊसमध्ये पाणी शिरल्याने हिडकल जलाशयामधून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हिडकल जलाशयामधून शहरवासियांना मिळणारे पाणी देखील बंद झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहराचाच पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण शहरातच पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अचानक निर्माण झालेल्या समस्येचा आणि पूरपरिस्थितीचा फटका शहरवासियांना बसला आहे. शहरात एकीकडे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.
नदीला आलेला पूर कमी झाल्यानंतर तसेच पाणी ओसरल्यानंतर पंपहाऊसमधील पाणी कमी होण्याची शक्मयता आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पंपहाऊसमधील पाणी कमी झाल्यानंतरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.