आमदार वैभव नाईक यांची माहिती : मालवण पालिका, आरोग्य प्रशासनाशी चर्चा
प्रतिनिधी / मालवण:
मालवण ग्रामीण रुग्णालयानजीक असलेल्या पालिकेच्या जागेत लवकरच 20 ऑक्सिजन बेड कोविड केअर सेंटर तयार केले जाणार आहे. यादृष्टीने आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी मुख्याधिकारी संतोष जिरगे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा करून बुधवारपर्यंत हे सेंटर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
याबाबत काही दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व डॉ. पाटील यांच्यासोबत नगरपालिकेच्या जागेची पाहणीही केली. आमदार नाईक यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन याबाबत तात्काळ आदेश काढण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना केली होती. त्याप्रमाणे केलेल्या मागणीनुसार मालवण ग्रामीण रुग्णालयानजीकच्या जागेत 20 ऑक्सिजन बेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी 50 ऑक्सिजन सिलिंडर, 10 कॉन्सन्टेटर उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्हय़ात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आमदार नाईक यांनी मालवण तालुक्मयाकरिता ग्रामीण रुग्णालयानजीक असलेल्या जागेत ऑक्सिजन बेड असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी केली होती. जिल्हा शल्य चिकित्सकांनाही याबाबत बैठक घेऊन तात्काळ कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांनी 20 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत तसेच याठिकाणी 50 ऑक्सिजन सिलिंडर, 10 कॉन्सन्टेटर उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार आज 20 बेड उपलब्ध झाले होते. तसेच 50 ऑक्सिजन सिलिंडर रत्नागिरी येथे पाठविण्यात आले होते.
नगरपालिकेत घेतला आढावा
नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या कक्षात आमदार नाईक यांनी आज सकाळी याबाबत आढावा घेतला. शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, बाळू नाटेकर, यशवंत गावकर आदी उपस्थित होते. कर्मचारी, डॉक्टर आणि आवश्यक साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. साहित्यासाठी तातडीने गाडी जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचेही निर्देश दिले. कोविक केअर सेंटरची जबाबदारी डॉ. कपील पाटील यांच्याकडे सोपविण्याचीही सूचना त्यांनी केली. मुख्याधिकाऱयांनी तातडीने इलेक्ट्रिशियनची कामे पूर्ण करून बेडची व्यवस्था तडतीने उभी करावी, असेही आमदारांनी स्पष्ट केले. पालिकेतर्फे सर्व व्यवस्था उभी करून ग्रामीण रुग्णालयातर्फे सेंटर चालविण्यात येणार असल्याचेही आमदारांनी स्पष्ट केले.
ग्रामीण रुग्णालयाचे पहिले सेंटर
50 ऑक्सिजन सिलिंडर असलेले जिल्हय़ातील पहिले कोविड केअर सेंटर मालवण ग्रामीण रुग्णालयात सुरू होणार आहे. यासाठी 10 कॉन्सन्ट्रेटरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे कोविडची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर मालवणातच उपचार होणे शक्य होणार आहे. जिल्हा रुग्णालयात फक्त व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱया रुग्णांना पाठविण्यात येणार आहे. मालवणातील रुग्णांना याच ठिकाणी सेवा उपलब्ध झाल्यास जास्तीत जास्त रुग्ण बरे होण्याची शक्यता आहे, असेही आमदारांनी सांगितले.