मारुती, हुय़ंडाई, टाटा यांची विक्री तेजीत – जुलैच्या तुलनेत मजबूत स्थिती
नवी दिल्ली
वाहन कंपन्यांकडून ऑगस्ट 2021 मधील वाहनांच्या विक्रीचे आकडे नुकतेच सादर करण्यात आले आहेत. यामध्ये जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमधील वाहन विक्री मजबूत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकी इंडियाने वर्षाच्या आधारे 4.8 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. हय़ुंडाईची विक्री ही वार्षिक स्तरावर 12.3 टक्क्यांनी वधारली आहे.
मारुती ः देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून ओळख असणाऱया मारुती सुझुकीची ऑगस्ट महिन्यात एकूण 1.30 लाख वाहनांची विक्री झाली आहे. हा आकडा वर्ष 2020 च्या तुलनेत 4.8 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती असून त्यावेळी 1.24 लाख वाहनांची विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
हय़ुंडाई ः हय़ुंडाईनेही ऑगस्ट महिन्यात विक्रीत चांगली कामगिरी केली असून वार्षिक विक्री 12.3 टक्क्यांनी वाढली आहे. ऑगस्टमध्ये 59,068 युनिटची विक्री झाली होती. हाच आकडा ऑगस्ट 2020 रोजी 52,609 इतका राहिला होता. देशातील वाहन विक्रीचा फायदा हा प्रामुख्याने कंपनीला झाला असून सदरची विक्री ही 46,866 इतकी राहिल्याचे सांगितले आहे.
टाटा मोर्ट्सची विक्री ः टाटा मोर्ट्सने गेल्या ऑगस्ट महिन्यात सरासरी विक्रीत 58.9 टक्क्यांची वर्षाच्या आधारे तेजी प्राप्त केली आहे. कंपनीने 57,995 युनिटची विक्री केली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 36,505 युनिटची विक्री झाली होती. टाटा मोर्ट्सने 66 टक्के वाढीसह वर्षाच्या आधारे 29,781 व्यावसायिक वाहने आणि 51 टक्क्यांच्या वाढीसह 28,018 प्रवासी वाहनांची विक्री केली आहे.
महिंद्राची विक्री घटली
महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीची वार्षिक वाहन विक्री ही ऑगस्ट महिन्यात 21.6 टक्क्यांनी घटली आहे. मागील महिन्यात एकूण 21,360 वाहनांची विक्री कंपनीने केली आहे. तर ऑगस्ट 2020 मध्ये 27,229 विक्री राहिली होती. दुसऱया बाजूला निर्यातीमध्ये तेजी राहिली असून ती 43 टक्क्यांनी वाढली आहे.