प्रतिनिधी/ बेळगाव
ऑटोनगर येथील प्लायवूड कारखान्याला अचानक आग लागून मोठी हानी झाली आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविली आहे.
घटनेची माहिती समजताच अग्निशमन विभागाचे वरि÷ अधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांचे सहकारी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्मयात आणण्यात आली. कांतीलाल पटेल यांचा हा कारखाना असून रात्री माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे..